जिन्नस:
टॉरटिला चिप्स (tostitos)
बटाटावड्याचे सारण
बारीक चिरलेला लेट्युस
बारीक चिरलेली काकडी
सालसा
किसलेले चीझ
मीठ व साखर चवीपुरते
शेंदरी रंगाच्या गाजराचे बारीक गोल काप साले काढून(सजावटीसाठी)
पालकाची छोटी पाने (सजावटीसाठी)
बटाटावड्याचे सारण: बटाटे उकडून, त्याची साले काढून कुस्करून घ्यावेत. त्यात कांदा, लसुण पाकळ्या, मिरच्या व कोथिंबिर खूप बारीक चिरून घालणे, लिंबू पिळावे. चवीपुरते मीठ व साखर घालावे, व ह्या सर्व मिश्रणाचा लगदा करावा. हे बटाट्याचे सारण तसेच कच्चे राहू देत.
क्रमवार मार्गदर्शन : सर्वात आधी एका डीशमध्ये गाजराचे गोल व बारीक काप ठेवा. मध्यावर पालकाची पाने लावून घ्या. मग त्यावर एकेक टॉरटिला चिप्स ठेवा. नंतर प्रत्येक चिप्स मध्ये सर्वात आधी बटाट्याचे सारण घाला. नंतर चिरलेला लेट्युस व काकडी घाला. नंतर सालसा व सर्वात शेवटी किसलेले चीझ घाला. चवीसाठी थोडे मीठ व साखर पेरा.अशी ही एक छान सजलेली चमचमीत डीश तयार होईल.
2 comments:
वा ! काय छान सजावट केली आहे तुम्ही. मला तर अशा सोप्या आयडीया आवडतात. ऊगाच जास्त कठीण रेसिपी असली कि मूड जातो बूवा
Kitchen मध्ये जायला लागणार नाही अशा रेसिपी द्या..लेटयूस कुठे मिळतो ? तो नाही घातला तर नाही का चालणार ?
Thank you so much Sadhana! lettuce ghatla nahi tari chalel.
Post a Comment