Friday, November 16, 2012

हिरव्या टोमॅटोची चटणी


साहित्य :

हिरवे टोमॅटो - २
कच्चे दाणे - मूठभर
हिरव्या मिरच्या - ३
लसूण पाकळ्या - ६
तेल - पाव वाटी
जिरे - चिमूटभर (फोडणीपुरते)
मीठ चवीपुरते


कृती :
लसूण पाकळ्या व मिरच्या बारीक चिरून घ्या. तसेच टोमॅटोच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. मध्यम आचेवर तवा तापत ठेवा. तवा तापला की त्यावर २-३ चमचे तेल घालून कच्चे दाणे परतून घ्या व नंतर ते एका ताटलीत काढून घ्या. परत २-३ चमचे तेल घालून त्यावर चिरलेल्या मिरच्या व लसूण पाकळ्या घालून खरपूस परता व नंतर ताटलीत काढून घ्या. याप्रमाणेच तेलावर टोमॅटोच्या फोडी परतून त्या ताटलीत काढून ठेवा. हे सर्व मिश्रण गार झाले की त्यात चवीपुरते मीठ घालून मिक्सरवर बारीक करून घ्या. नंतर ही तयार झालेली चटणी एका बाऊलमध्ये घाला. मध्यम आचेवर एक कढले तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात २ चमचे तेल घाला व ते तापले की त्यात जिरे घाला. जिरे तडतडले की गॅस बंद करा. जिऱ्याची केलेली फोडणी चटणीवर घालून चमच्याने एकसारखे ढवळा. चटणी तयार झालेली आहे. इडली डोश्यासोबत ही चटणी छान लागते.

5 comments:

Yashwant Palkar said...

सार काही आहे फक्त मिक्सरची सोय करावी लागेल ............
करून बघेन आणि कळवेन

rohini gore said...

nakki karun bagha,, tumhala khup aavdel hi chutney,, chav khup chhan lagte, thanks for abhipray ! :)

Fox Thinker said...

हार्दिक अभिनंदन.. आपल्या लेखनाने प्रभावित होऊन आम्ही आपल्या ब्लॉगचा समावेश मराठी वेब विश्व वर केला आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या.

www.Facebook.com/MarathiWvishv
www.MWvishv.Tk
www.Twitter.com/MarathiWvishv


धन्यवाद..!!
मराठी वेब विश्व - मराठीतील सर्व संकेतस्थळे एकाच छताखाली..
आम्ही मराठीतील प्रत्येक संकेतस्थळावरील हालचाल समस्त वाचकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.


टिपंणी प्रकाशित केल्याबद्दल आभारी आहोत..!!

Subodh Deshpande said...

सुदंर..
ह्या चटनीमध्ये, पांढरे तीळ, थोडे हलके भाजून घातले, की चव अजून सुरेख येते,
त्यावेळेला शेंगदाणे आणि लसूण पाहीजेच असे नाहि

rohini gore said...

pandhre teel ghalun pahin ,, thanks for reply !