Thursday, May 30, 2013

घेवड्याची भाजी


जिन्नस :

घेवड्याच्या शेंगा सोललेल्या (३ते ४ वाट्या)
१ बटाटा उकडून त्याच्या फोडी
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
दाण्याचे कूट २ मूठी
नारळाचा खव १ मूठ
थोडा गूळ
चवीपुरते मीठ
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, हळदमार्गदर्शन : घेवड्याच्या शेंगा कूकरमध्ये शिजवून घ्या. कूकर गार झाला की शिजलेल्या शेंगा बाहेर काढा. शिजताना त्यात थोडे पाणी घाला. शिजल्यावर यातले पाणी एका वाटीत काढा. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. ते तापले की त्यात पुरेसे तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा. नंतर त्यामध्ये घेवड्याच्या शिजलेल्या शेंगा आणि उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घाला आणि ढवळा. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला, मीठ, गूळ, दाण्याचे कूट, नारळाचा खव घाला. परत एकदा भाजी नीट ढवळून घ्या. नंतर शिजवलेल्या घेवड्याच्या शेंगातले पाणी काढून ठेवलेले घाला. नंतर त्यावर झाकण ठेवा. ५ मिनिटे भाजी शिजू दे. थोड्यावेळाने गॅस बंद करा. पोळीपेक्षाही ही भाजी भाताबरोबर छान लागते.

No comments: