Monday, May 20, 2013

तिखटामीठाच्या पुऱ्या


 जिन्नस :

कणिक अडीच वाट्या
लाल तिखट दीड चमचा
धनेजिरे पूड दीड चमचा
हळद अर्धा चमचा
चवीपुरते मीठ
मूठभर चिरलेली कोथिंबीर
५-६ चमचे तेल (कणकेत घालायला)
तळणीसाठी तेल


मार्गदर्शन : कणकेमध्ये वरील सर्व जिन्नस घालून घट्ट कणिक भिजवा. अर्ध्या तासाने मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात पुरेसे तेल घाला. तेल जरा जास्ती घालावे म्हणजे पुरी फुगण्यास वाव मिळतो. भिजलेली कणिक अजून थोडी मळून घ्या. नंतर त्याचे छोटे गोळे करा व पुऱ्या लाटा. तेल तापले की त्यात सर्व पुऱ्या तळून घ्या. अडीच वाट्यांमध्ये ५० छोट्या पुऱ्या होतात. मधवेळी खाण्यास द्या. या पुऱ्या गरम खाल्या की बरोबर काहीही नसले तरी चालते इतक्या छान होतात. गार झाल्या तर लोणच्यामधेय थोडे दही घालून एकसारखे करा किंवा दाण्याची दह्यातली चटणी सोबत घ्या. 
या पुऱ्या खुसखुशीत व कुरकुरीत होतात.


पुऱ्या चांगल्या होण्यासाठी टीपा :

कणीक भिजवताना मीठ अंदाजे घातले तरी सुद्धा तिखट मीठ घातल्यावर कणीक एकसारखी ढवळा आणि चव बघा. मीठ कमी असेल तर परत घाला. आळणी तिखटामिठाच्या पुऱ्या चांगल्या लागत नाहीत.
पुऱ्यांची कणीक जास्तीत जास्त घट्ट भिजवावी.

तासभर मुरू द्यावी.

तळणीसाठी तेल जरा जास्त घ्यावे म्हणजे पुरी फुगायला वाव मिळतो.

तेल व्यवस्थित तापू द्यावे.

तेल व्यवस्थित तापले आहे की नाही याकरता एक टीप आहे. कणकेचा खूप बारीक अगदी छोटा गोळा तेलामध्ये घालावा. तो जर पटकन वर आला तर तेल पुरीसाठी व्यवस्थित तापले आहे असे समजावे.

पुरी फुगण्यासाठी कडेने जास्त लाटावी.

पुरी तेलात सोडून ती लगेच फुगते जर का ती नीट लाटली असेल तर आणि शिवाय जर ती फुगली नाही तर झारेने त्यावर कढईतल्या कढईत पुरीच्या वर तेल घालावे म्हणजे फुगण्यास वाव मिळतो.

या तिखटामिठाच्या पुऱ्या मधवेळी करून खाऊ शकता. नंतर १ कप चहा. अथवा १ फळ किंवा ताक व दही,
२ ते ३ दिवस टिकतात त्यामुळे स्वयंपाकाचा कंटाळा आला तर पुरीसोबत बटाटा भाजी करून खा.
सहलीसाठी जाण्यासाठी उपयुक्त कोरड्या असल्याने.

पुऱ्या तळून झाल्या की पेपर टावेल वर ठेवा म्हणजे पुरीत असलेले जास्तीचे तेल निथळून जाईल. 




5 comments:

Subodh Deshpande said...

ह्या पुर्या किति दिवस टिकतात, कारण गुजराथी किंवा कच्छि लोक जे बाजरी वडे नामक पाणीपुरिच्या आकाराच्या तिखटामिठाच्या, मेथियुक्त थोड्या कड्क पण सहज खाता येण्यासारख्यापुर्या करतात त्या जवळ-जवळ तीन आठ्वडे काहिहि न होता टिकतात, अशा चार-पाच बाजरीवडे नामक पुर्या बिस्किटाऐवजी, हल्का नाष्टा म्हणून चहा बरोबर सहज चालून जातात

rohini gore said...

2 te 4 divas tikat asavyat,, ha purya purvi karayche kahijan pravasat khanyasathi

महेंद्र said...

माझी आई ह्या मधे तिळ आणि थोडा ओवा, किंवा लसूण मिरचीची पेस्ट+ तिळ पण घालते:) माझा फेवरेट पदार्थ.

rohini gore said...

thanks ! mi pan ashya paddhatine karun pahin purya nakii !

अपर्णा said...

Slrrrrrrrp