Tuesday, January 16, 2007
शेवयांचा उपमा
वाढणी:२ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस:
कुस्करलेल्या शेवया १ वाटी
साजुक तुप अथवा तेल
मोहोरी, हिंग, चिमूटभर हळद, आणि लाल तिखट
मीठ, साखर, लिंबू १/२
चिरलेला कांदा १ वाटी, हिरव्या मिरच्या ३ ते ४
भाजलेले शेंगदाणे १०/१२
क्रमवार मार्गदर्शन: १ चमचा साजुक तूप अथवा तेलामधे शेवया गुलाबी रंग येईपर्यंत भाजुन घ्या. शेवया भाजताना गॅस मंद ठेवा. ४ ते ५ चमचे साजुक तूप अथवा तेलामधे मोहोरी, हिंग, हळद, आणि लाल तिखट घालुन त्यात मिरच्या, कांदा, भाजलेले दाणे घालुन परता. कांदा शिजायला पाहिजे. नंतर त्यात २ वाट्या पाणी ,चवीप्रमाणे मीठ,साखर घालुन लिंबू पिळून ढवळा. पाण्याला उकळी आली कि त्यात भाजलेल्या शेवया घालुन ढवळा. नंतर झाकण ठेवून गॅस मंद आचेवर १ ते २ मिनिटे ठेवा.
शेवयांचा उपमा गरम गरम खायला द्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment