वाढणी:२ जण
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
तांदुळ २ वाट्या (लाँग ग्रेन राईस)
उडीद डाळ अर्धी वाटी
अर्धा मोठा कांदा
चिरलेली कोथिंबीर १ वाटी
तिखट हिरव्या मिरच्या ३-४
चवीपुरते मीठ, व तेल
क्रमवार मार्गदर्शन: तांदुळ व उडीद डाळ दुपारी १ ला पाण्यात भिजत घालणे वेगवेगळ्या पातेल्यात. रात्री १० ला मिक्सर/ग्राइंडर मधे बारीक वाटून घेणे. दुसऱ्या दिवशी दुपारी १२ ला उत्तप्पा करणे. उत्तप्पा करताना त्यामध्ये कांदा थोडा जाड चिरून घालणे. शिवाय मिरच्यांचे बारीक तुकडे , चिरलेली कोथिंबीर, व चवीप्रमाणे मीठ घालून तवा चांगला तापल्यावर थोडे तेल घालून कालथ्याने पसरवणे व नंतर तव्यावर जाड उत्तप्पे घालणे. उत्तप्पा घालून झाल्यावर ५-६ सेकंदाने थोडे तेल उत्तप्पाभर पसरवून नंतर ५-६ सेकंदाने उलटणे. म्हणजे दोन्हीकडून खरपूस भाजला जाईल.
ओल्या नारळाची दह्यातली पातळ चटणी व तिखट सांबाराबरोबर खाणे.
रोहिणी गोरे
1 comment:
सगळे एकत्र करायचे का? मी उत्तप्पा टाकल्यावर मग कांदा वगैरे टाकते. त्यामुळे माझा नीट होत नाही वाट्ते.
Consistency किती ठेवायची?
Post a Comment