Monday, January 15, 2007
पोळी
वाढणी:१ जण
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस:
कणीक १ वाटी (मध्यम)
मीठ चिमुटभर
तेल २ चमचे
पाणी
१ मध्यम वाटी कणकेच्या ४ पोळ्या होतात
क्रमवार मार्गदर्शन:
कणीक भिजवणे
कणिक भिजवताना त्यात थोडे चविपुरते मीठ व तेल घालावे. थोडे थोडे पाणी घालुन कणिक भिजवावी, सैल अथवा घट्ट नसावी. थोडे तेल घालुन कणिक खूप मळावी, म्हणजे एकसारखी भिजेल. भिजल्यावर १५ मिनिटांनी पोळ्या कराव्या.
पोळी लाटणे
पोळी लाटताना परत थोडी कणिक मळुन घेणे. कणकेचा मध्यम आकाराचा गोळा घेउन तो गव्हाच्या पिठात बुडवुन लाटावा, थोडासा लाटुन त्यावर तेल लावुन त्रिकोणी अथवा गोल घडी करावी. परत गव्हाचे पीठ लावून ती गोल अथवा त्रिकोणी पोळी लाटावी. लाटताना पिठाचा वापर जास्त करावा म्हणजे पोळी पोळपाटाला कधिही चिकटत नाही. पोळी कडेकडेनी लाटावी, म्हणजे लाटण्याचा दाब पोळीच्या सर्व कडेच्या बाजुंवर एकसारखा पडला पाहिजे. लाटण्याचा दाब पोळीच्या मध्यभागी जास्त झाला तर मध्यभागी पोळी पातळ व बाजुने जाड होईल, त्यामुळे भाजताना पोळी मध्यभागी जास्त भाजली जाइल व कडा जाड राहिल्याने कच्या रहातील.
पोळी भाजणे
पहिली पोळी लाटायच्या आधी गॅसवर मध्यम आचेवर तवा ठेवावा,म्हणजे पोळी लाटेपर्यंत तवा चांगला तापेल. तवा नेहमी मध्यम आचेवर ठेवावा. कमी आचेवर तापलेल्या तव्यावर पोळी भाजली तर कडक होईल, जास्त आचेवर भाजली तर कच्ची राहील. पोळी भाजताना कमितकमी वेळा उलटावी. पोळी भाजताना जेथुन वाफ बाहेर येत असेल तेथे वाटीने दाबुन ठेवावी म्हणजे दुसरीकडून पोळी फुगते. असे केल्याने पोळी सर्व बाजुने भाजली जाते, फुगते. पोळी तव्यावरुन खाली काढल्यावर ती पोलपाटावर आपटावी, म्हणजे चक्क मोडावी, म्हणजे आतील वाफ निघुन जाते व पोळी कडक होत नाही. नंतर पोळीला २ ते ३ थेंब तेल लावून पोळीच्या डब्यात ठेवणे.
कणिक भिजवल्यापासुन भाजेपर्यंत सर्व काळजी घेतली तर पोळ्या चांगल्या होणारच.
टीपः पोळ्या जास्तीत जास्त आपल्याकडून लाटल्या गेल्या की आपोआपच जास्तीत जास्त चांगली पोळी होण्याचे कौशल्य प्राप्त होते, आणि म्हणूनच रोज दुपारी जेवायला पोळी भाजी हा मेनू असावा.
रोहिणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
6 comments:
mazi poli purn kadhi ch fugat nahi ka
mazi poli purn kadhi ch fugat nahi ka
रोहिणीताई..
आज सहज म्हणून तुझ्या ब्लॉगवर डोकावले की काही नवीन टाकले आहेस का पाहायला..
आणि लेखन प्रवास परत वाचला..प्रसन्न वाटले.
अगदी नकळतपणे पोळ्या पाहिल्या.
आधी मी कोणतीतरी गोल्डनगेट कणिक आणलेली. तिच्या पोळ्या लालसर झाल्या. मग कोणीतरी सुजाता कणिक सजेस्ट केली. मग ती आणली. तिच्या पोळ्या चांगल्या, म्हणजे पांढऱ्या झाल्या. पण एकदा त्या कणकेत माती आढळली. आता दीप कणिक आणली आहे.
तर सांगयचे हे की कणिक बदलून झाल्या तरी, एक रंग सोडला तर बाकी काहीच चांगले व्हायचे नाही. पोळ्या तशाही मला चांगल्या येत नाहीत. कडकच होतात. आता तू सांगितलेले बारकावे लक्षात घेईन. मला खुप वाटतं की मी केलेल्या पोळ्या छान मऊ व्हाव्या. संध्याकाळी सुद्धा खाता याव्यात, इतपत मऊ व्हाव्यात.
होतील ना गं?
मस्त पोस्ट . अगदी मुद्देसूद. आवडली.
Thanks Aparna !
manaswini aani aparna,, Ashirvad atta khup chhaan aahe, to vaprun paha,, indiatil kanik jashi aste tyachya khup javal jato ha aata,, aata tar mi hach vaparte itaka mala to aavdala aahe
Post a Comment