वाढणी:४-५ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:१२० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस:
मटारचे दाणे अर्धा किलो
१ मोठा बटाटा, १ छोटा कांदा, ७-८ मिरच्या, ७-८ लसुण पाकळ्या,
प्लॉवर ची फुले ३-४, लिंबू अर्धे छोटे, चिरलेली कोथिंबीर १ वाटी, तीळ ३-४ चमचे
धने-जिरे पावडर १ चमचा, लाल तिखट १ चमचा, हळद, हिंग थोडे, मीठ, साखर.
मैदा २ वाट्या
तळणीसाठी तेल
क्रमवार मार्गदर्शन: कूकरमधे मटारचे दाणे व बटाटा शिजवणे. शिजलेले मटार रोवळीमधे पाणी निथळण्यासाठी काढून ठेवणे. नंतर मैदा भिजवणे. मैदामध्ये लाल तिखट, धनेजीरे पूड, थोडी हळद व हिंग, भाजलेले तीळ, चवीपुरते मीठ, चिरलेली अर्धी वाटी कोथिंबीर व अर्धी वाटी तेल गरम करुन त्यावर ओतणे. हे सर्व मिश्रण चमच्याने कालवून घेणे, म्हणजे सर्व पीठाला तिखट-मीठाची चव लागेल. मैदा घट्ट भिजवणे. मैदा २ तास मुरवत ठेवणे.
आता लसुण, मिरच्या व कांदा खूप बारीक चिरणे. बटाटे कुस्करुन घेणे. फ्लॉवरची फुले बारीक चिरणे. नंतर मटार, कुस्करलेला बटाटा, चिरलेले कांदा, लसुण, व मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, चिरलेला फ्लॉवर यामधे थोडे लाल तिखट, हळद, हिंग, धनेजीरे पूड , चवीप्रमाणे मीठ व लिंबू पिळून सर्व मिश्रण चमच्याने एकसारखे कालवून घेणे.
आता भिजवलेल्या मैद्याचा छोटा गोळा घेउन सर्वात पातळ व मोठी पोळी लाटणे. लाटताना तांदुळाच्या पिठीचा वापर करावा. नंतर या पोळीचे कालथ्याने अथवा कातण्याने तीन भाग करणे. हे तीन भाग म्हणजे सामोसाच्या पट्ट्या, या तीन पट्टयांवर मटारचे केलेले सारण घालून खणासारखी त्रिकोणी घडी करणे. याप्रमाणे सर्व सामोसे करुन घेतल्यावर गुलाबी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर तेलात तळणे व गरम गरम खाणे. चटणी नसली तरी चालते.
पोळी जितकी पातळ तितके सामोश्याचे आवरण कुरकुरीत होईल. मैद्यामधे थोडा बारीक रवा घातल्यास सामोसा खूप कुरकुरीत होतो. पण मैदा कुटून घ्यावा लागतो, व लाटताना खूप त्रास होतो. गव्हाच्या पीठाचे पण सामोसे करतात. २ वाट्यांमधे लहान २०-२५ सामोसे होतात.
रोहिणी
4 comments:
wow!!! chan ahe. mi pan ghari samosa banavate, batyatachi sukhi bhaji, tyat hirva vatana,dhana, jira ani badhishop chi pud,tikhat ani garam masala fodani karun ghete chan bantata.
thank you me he pan try karen.
thanks sheetal!! mi ajun pujabi samosa banavla nahiye. baghu kadhi yog yeto te. shivay ajun ek prakar, kurkurit samose green bakery madhe astat tasehi banavta yetat. te hi banvin aani recipe lihin. thanks!
रोहिणीताई,
खूप दिवसापासून सामोसा खावासा वाटत होता. आणि नेहमीप्रमाणे तुझा ब्लॉग पाहिला. तळेलेले पदार्थात दिसला सामोसा. कृती अगदी सोपी वाटली. करून पण पहिली. पण काही गोष्टी चुकल्या. अर्थात तुझ्या पा.कृ मुळे नाही बरं का.. अनुभवाचा जोर कमी पडला. अर्थात माझा अनुभव.
त्यामुळे परत तुलाच सांगणे आले कि काय चुकले आणि भविष्यात त्यात काय सुधारणा करता येईल याविषयी..
माझी मैद्याची पोळी फार लाटल्याच जात नव्हती. त्यामुळे पातळ पोळी झालीच नाही. तुझ्या फोटोतल्या पोळीसारखी तर नाहीच गं.
मला सामोसा खणाप्रमाणे गुंडाळता आला नाही. त्यामुळे आधीच जाड पोळी आणि त्यात नीट गुंडाळी पण नाही त्यामुळे सामोसे कसे झाले असतील याचा अंदाज तू घेऊ शकतेस.
सारण मात्र ए-वन झाले असल्यामुळे, सामोसे बरे पोटात गेलेत. पण वरच्या पोळीमुळे मूड पुरता गेला.
माझी एक विनंती आहे तुला. माझ्यासाठी का होईना, तू सामोस्याची मला व्हिडीओ पाक-कृती द्यावीस. म्हणजे निदान माझे जिथे चुकले आहे, त्या चुका माझ्याकडून पुन्हा होणार नाही आणि पदार्थाचा योग्य तो आदर राखून सन्मानाने तो पोटात जाईल. आणि तृप्तता मिळेल ती निराळीच.
- सौ. अवनी राजोपाध्ये
Avani,, mi nakkich ek video recipe deiin yachi,, thanks,, :)
Post a Comment